मालेगावी चर्च परिसरात नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:07+5:302021-02-27T04:17:07+5:30
या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या ...
या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या भागात गटारी नसल्याने पावसाचे पाणी व इतर सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही तसेच घाण पाणी घरांमध्ये शिरते व सखल भागात साचून राहते. परिणामी डास निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. याठिकाणी अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे न केल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच या भागात झाडू कामगार, घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे घाण, कचरा साचून राहतो. महापालिकेने याविषयी गंभीर दखल घेऊन वेळोवेळी औषध फवारणी करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर विशेष निधीतून भूमिगत गटारी निर्माण कराव्यात अन्यथा या भागातील रहिवासी महानगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा कर भरणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी परिसरातील रहिवासी शैला अहिरे, शोभना बच्छाव, इंदुमती पाटील,ज्योती अहिरे, रेखा कोठावदे, शोभा पाचपुते, आशाबाई भामरे, मनोहर देशमुख, सचिन वाघ, संजय पाचपुते, नानाजी अहिरे, विश्वनाथ घोरपडे, तुळशीदास देशमुख, गोपाळराव देवरे, राजेंद्र कोठावदे आदी उपस्थित होते.