समन्वयाचा अभाव : व्यावसायिकांनी भरली रक्कम दुकाने भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:28 AM2018-05-19T01:28:14+5:302018-05-19T01:28:14+5:30

सिडको : जुने सिडको भागातील सुमारे ५०हून अधिक व्यापाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी रक्कम भरूनही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सुमारे १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले.

Lack of coordination: The amount filled by the professionals is in the shops | समन्वयाचा अभाव : व्यावसायिकांनी भरली रक्कम दुकाने भुईसपाट

समन्वयाचा अभाव : व्यावसायिकांनी भरली रक्कम दुकाने भुईसपाट

Next
ठळक मुद्देआॅनलाइन तक्रार असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एक ते दीड एकर जागेवर सिडको प्रशासनाचा ताबा

सिडको : जुने सिडको भागातील सुमारे ५०हून अधिक व्यापाऱ्यांनी सिडको प्रशासनाकडे व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी रक्कम भरूनही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून सुमारे १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केले. सिडकोकडे जागेचे पैसे भरल्यानंतर तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही केवळ महापालिका व सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे दुकाने हटविल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्याला अडथळा ठरणारे तसेच आॅनलाइन तक्रार असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जुने सिडको येथील १८ दुकानांची अतिक्रमणे हटविण्यात आली. परंतु जुने सिडको येथे व्यवसाय करणाºया व्यावसायिकांनी गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी सुमारे ५०हून अधिक व्यापाºयांनी सिडको प्रशासनाकडे जागेसाठी रक्कम भरलेली असून, त्याबदल्यात सिडकोने जागा दिल्याचे पत्र (अ‍ॅलॉटमेंट लेटर)देखील व्यावसायिकांना दिलेले आहे. जुने सिडको येथे सुरू असलेल्या दुकानांच्या जागेसह परिसरातील सुमारे एक ते दीड एकर जागेवर सिडको प्रशासनाचा ताबा आहे. तसेच सातबारा उताºयावरही सिडकोचेच नाव असून, सदरची जागा ही सिडकोची असल्याचे सिडको प्रशासकांकडून सांगण्यात आले आहे. अशी परिस्थिती असतानाही महापालिकेने रस्त्याला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून बुधवारी (दि.१६) दुकानांचे अतिक्रमण हटविल्याने व्यापाºयांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शविला असतानाही मनपा प्रशासनाने न जुमानता अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू ठेवत १८ दुकाने भुईसपाट केली. यात अनिल हेअर कटिंग, मिलन टायर वर्क्स, मिलन फेब्रिकेशन वर्क्स, आर. के. स्विट्स, माय चॉइस टेलर, महाराष्टÑ हार्डवेअर, सप्तशृंगी किराणा, भामरे मिसळ, डिसूझा वॉच हाउस, मुक्तार गॅरेज, मोबिन फॅब्रिकेशन, गणेश अ‍ॅल्युमिनियम आदींसह १८ दुकानांचे अतिक्रमण उद्ध्वस्त केल्याने दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Web Title: Lack of coordination: The amount filled by the professionals is in the shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको