साने गुरुजी नगरात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 09:27 PM2020-12-24T21:27:46+5:302020-12-25T00:57:24+5:30
येवला : शहरातील साने गुरुजी नगरातील विविध समस्यांप्रश्नी रहिवासी वर्गाने पालिका मुख्याधिका-यांना निवेदन सादर करत सुविधांची मागणी केली आहे.
येवला : शहरातील साने गुरुजी नगरातील विविध समस्यांप्रश्नी रहिवासी वर्गाने पालिका मुख्याधिका-यांना निवेदन सादर करत सुविधांची मागणी केली आहे.
मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत मुख्य लिपिक पी. वाय. मांडवडकर यांना सदर निवेदन देण्यात आले. साने गुरुजी नगरात गेल्या २५ वर्षात नागरी सुविधा मिळत नसल्याने रहिवासी वर्गाची मोठी गैरसोय होते आहे. सांडपाण्यासाठी गटार नसल्याने रहिवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. गटारअभावी शोषखड्डे भरून जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. वेळोवेळी पालिका अधिका-यांना सांगूनही दखल घेतली गेली नाही. पालिकेने तातडीने साने गुरुजी नगरात गटार व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख म. का. चव्हाण, राजेंद्र धारक, संतोष महाले, नितीन भावसार, महेंद्र भगत आदींसह रहिवासी वर्गाच्या स्वाक्ष-या आहेत.