जुन्या शासकीय इमारतीत लिफ्टचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:34 AM2018-12-25T00:34:02+5:302018-12-25T00:34:33+5:30

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पवॉक किंवा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा शासकीय आदेश असताना अद्यापही नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांतील जुन्या इमारतीमध्ये या सुविधांचा अभाव दिसून येतो.

Lack of lift in old government buildings | जुन्या शासकीय इमारतीत लिफ्टचा अभाव

जुन्या शासकीय इमारतीत लिफ्टचा अभाव

Next

नाशिक : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पवॉक किंवा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा शासकीय आदेश असताना अद्यापही नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांतील जुन्या इमारतीमध्ये या सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे दिव्यांग व्यक्ती तसेच बाहेरून कामानिमित्त आलेल्या दिव्यांग नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. इमारतींच्या अनेक पायऱ्या चढताना अशा व्यक्तींची मोठी परवड होत आहे.  कोणत्याही शासकीय कार्यालयात जाताना सर्वसामान्य व्यक्ती पटकन पायºया चढून जाऊ शकतो. परंतु दिव्यांग व्यक्तींना यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आदिवासी आयुक्त कार्यालय, धर्मदाय आयुक्त कार्यालय, अपंग दिन विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय तसेच जिल्हा परिषदची इमारत यांसह अनेक नव्या व जुन्या इमारतींमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पवॉक आणि लिफ्टची सुविधा नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. सर्व अपंग कर्मचाºयांना आवश्यक त्या शासकीय सुविधा पुरविण्याचे आदेश दिलेले असताना आजही अनेक इमारतींमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याने येथे काम करणारे दिव्यांग कर्मचारी आणि बाहेरून आपल्या कामासाठी येणारे दिव्यांग नागरिक यांची कुचंबणा होत आहे.
संतप्त भावना
रॅम्पवॉक आणि लिफ्ट नाही त्याचबरोबर स्वच्छतागृहात कमोडची व्यवस्थादेखील नाही. शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले सुगम्य अभियान केवळ कागदोपत्रीच आहे. तसेच दिव्यांगांच्या सोयीसुविधांचे वावडे आहे काय? अशी संतप्त भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

Web Title: Lack of lift in old government buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक