जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:07 PM2020-05-06T21:07:46+5:302020-05-06T23:42:46+5:30

मालेगाव:  शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मालेगाव रेड झोनमध्ये असल्याने सर्वांचेच लक्ष या शहराकडे लागून आहे.

Lack of necessities | जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

Next

मालेगाव (शफीक शेख) शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मालेगाव रेड झोनमध्ये असल्याने सर्वांचेच लक्ष या शहराकडे लागून आहे. मालेगावात मोठ्या संख्येने बिहार, उत्तर प्रदेशातील यंत्रमाग मजूर असून, यंत्रमाग बंद असल्याने लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेल्या मजुरांची उपासमार होत असल्याने अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे गेले तर काही मजुरांना प्रशासनाने रोखून धरले आहे.
मालेगाव शहरात स्थलांतरित २१ मजूर आहेत. प्रशासनाने सर्व स्थलांतरित २१ मजुरांना कॉरण्टाइन केले असून, त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था मुंबई - आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा भागात असलेल्या जाट मंगल कार्यालयात केली आहे. तेथे सर्व स्थलांतरित मजुरांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांना रोज सकाळी चहा, नास्ता आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. शिवाय सुरळीतपणे पाणीपुरवठादेखील केला जात आहे. मालेगावात असणारे सर्व २१ स्थलांतरित मजूर हे पुण्याहून मुंबईकडे
जात होते. महसूल प्रशासनाने त्यांना अडवून कॉरण्टाइन केले आहे.
मालेगावात निवासास असलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील छत्तरपूर गावातील रहिवासी आहेत. गेल्या सुमारे २० दिवसांपासून सर्व मजूर मालेगावात अडकून पडले असून, त्यांना त्यांच्या गावी जायची ओढ लागली आहे. शासनाने इतर मजुरांप्रमाणेच आपल्यालादेखील आपल्या राज्यात आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत प्रशासनाने केलेली नाही यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही.

गुगुळवाडच्या मजुरांचा प्रशासनावर आरोप
मालेगाव तालुक्यातील ८७ ऊसतोड मजूर सुमारे दीड महिन्यापासून गुजरात राज्यात अडकले होते. दोन दिवसांपूर्वीच ते गुगुळवाड ला परतले असून ग्रामस्थांनी त्यांना धान्य किराणा यांची मदत करून जंगलातच कोरेन्टाईन करण्यात आले आहे.
प्रशासनाने आम्हाला गुजरात मधून आणताना आणि आल्यानंतर कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप केल्याचे माजी सरपंच आर. डी. निकम यांनी केला आहे.
------------------------------------
मंगल कार्यालयात व्यवस्था
मालेगाव शहरापासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर मध्य प्रदेशातील स्थलांतरित मजुरांना ठेवण्यात आले आहे. जाट मंगल कार्यालयात त्यांना दोन वेळच्या जेवणाची जरी व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यांना इतर जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. लहान मुलांना सांभाळताना या मजुरांना सर्कस करावी लागत आहे.

Web Title: Lack of necessities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक