नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:05 AM2017-11-10T00:05:45+5:302017-11-10T00:06:44+5:30

महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

Lack of Planning: Opening of question papers, there is no seriousness of security | नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

नियोजनाचा अभाव : सुरक्षिततेचे गांभीर्य नसल्याचेही उघड प्रश्नपत्रिका वाटपात गोंधळ

Next
ठळक मुद्देसप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळपरीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागलीपुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा

नाशिक : महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाच्या वतीने इयत्ता पहिली ते आठवीसाठी शाळांना देण्यात येणाºया प्रश्नपत्रिका सलग दुसºया दिवशी कमी पडल्याने ऐन परीक्षेत शाळा प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. धावाधाव केल्यानंतर शहरातील शाळांना प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याही मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा झेरॉक्स प्रश्नपत्रिकेवर घ्यावी लागल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये अशाच प्रकारचा गोंधळ होऊनही शिक्षण विभागाने कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाच्या आदेशान्वये यंदा दिवाळीनंतर सहामाही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील शाळांनी दोन महिन्यांपूर्वीच विद्यार्थी संख्या आणि माध्यमनिहाय प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदविलेली आहे. असे असतानाही बुधवार आणि गुरुवारीही भाषा आणि इंग्रजी विषयाच्या परीक्षेला प्रश्नपत्रिका वाटपाचा प्रचंड गोंधळ निर्माण झाला. शहरातील अनेक शाळांना प्रश्नपत्रिका मिळाल्याच नसल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शाळाच्या यंत्रणेची धावपळ झाली. काही ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांना सेमी इंग्रजीच्या, तर सेमी इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका मराठी माध्यमांना मिळाल्याने ऐनवेळी यंत्रणेला धावाधाव करावी लागली. प्रश्नपत्रिका कमी मिळाल्याच्या तक्रारी शहरातील अनेक शाळांनी केल्यानंतर वाटप केंद्राने शाळांना प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढण्याचा सल्ला दिल्याची तक्रार अनेक शिक्षकांनी केली आहे. ज्या यंत्रणेकडे प्रश्नपत्रिकेच्या गोपनीयतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून झेरॉक्स काढण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने शिक्षकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, दोन महिने अगोदर प्रश्नपत्रिकांची मागणी नोंदवूनही वाटपाचे नियोजन फसल्याने शिक्षण विभागाच्या यंत्रणेविषयी शंका उपस्थित करण्यात आली. शहरातील एका बड्या शाळेला तब्बल ५००, तर इतर काही शाळांना ६० ते ७० प्रश्नपत्रिका कमी आल्याच्या तक्रारी बुधवारी नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका कमी आल्याचे लेखीपत्र मुख्याध्यापकांकडून घेण्यात येत होते. अर्थात असा कोणताही प्रकार झाला नसून पुरेपूर प्रश्नपत्रिका पुरविण्यात आल्याचा दावा येथील केंद्राकडून करण्यात आला.

Web Title: Lack of Planning: Opening of question papers, there is no seriousness of security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.