कमी झोपेमुळे अनेकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:19 AM2021-08-27T04:19:00+5:302021-08-27T04:19:00+5:30

नाशिक : प्रत्येकाच्या आयुष्यातील धावपळ, ताणतणाव, चिंता, वाढलेला स्क्रीनटाइम यासह विविध कारणांमुळे अनेक नागरिकांच्या झोपेच्या वेळेत घट झाली आहे. ...

Lack of sleep lowers the immune system of many | कमी झोपेमुळे अनेकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट

कमी झोपेमुळे अनेकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट

Next

नाशिक : प्रत्येकाच्या आयुष्यातील धावपळ, ताणतणाव, चिंता, वाढलेला स्क्रीनटाइम यासह विविध कारणांमुळे अनेक नागरिकांच्या झोपेच्या वेळेत घट झाली आहे. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर उशिरा झोपण्याच्या सवयीने अनेक नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत घट झाल्याने सातत्याने आजारपण येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

मोबाइल, लॅपटॉपवर मध्यरात्रीनंतरही उशिरापर्यंत बसणे, चॅट करणे, गेम खेळणे यासारख्या काही वाईट आणि अयोग्य सवयींचा नकारात्मक परिणाम हा रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. दिवसभर मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर काम करणे, गेम खेळणे, सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह राहणे जे पूर्णत: चुकीचे आहे. शारीरिकरीत्या सक्रिय न राहिल्यानेदेखील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे अनेकांना गंभीर आजार विळखा घालू लागतात. सकाळी उशिरा उठणं, रात्रभर कॉम्प्युटर किंवा मोबाइलवर गेम खेळणं, उशिरापर्यंत टीव्ही पाहणं यामुळे अनेक जण रात्री उशिरा झोपतात. झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस म्हणजेच ताणतणाव वाढतो आणि यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याच्या क्रियेत बाधा येते. यामुळे अनेक माणसांना दररोजच अशक्तपणा वाटण्यासह रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.

इन्फो

किमान ७ तास झोप आवश्यक

झोपेचा अभाव शरीराच्या सर्व यंत्रणेवर नकारात्मक परिणाम करतो आणि बहुतांश गंभीर रोगांचे कारण ठरतो. त्यामुळे निर्धारित ७ ते ९ तासांपेक्षा कमी झोपणे हे अनेक समस्यांचे मूळ असते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यावश्यकच असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवून तसे वागण्याची गरज आहे.

इन्फो

संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक

रोगप्रतिकारक शक्ती ही काही प्रमाणात संतुलित आहार आणि व्यायामावर अवलंबून असते. संतुलित, पौष्टिक आणि सकस आहारामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नियमित प्रिजर्वेटिव्स आणि शुगर असणाऱ्या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनाचा परिणाम पचनक्रियेवर होतो. ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ लागते. त्यामुळे ताजा, पौष्टिक, सात्त्विक आहार घेणे आवश्यक असते. तसेच नियमित किमान एक वेळ व्यायाम आवश्यक असतो. वयोमानानुसार शरीराला झेपेल इतका व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

इन्फो

रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल

आपण आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपेत घालवतो. झोप ही शरीरातील पुनर्प्राप्तीची नियमित प्रक्रिया आहे. निरोगी आणि योग्य झोप ही यशस्वी दिवसाची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कारण हीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराची ढाल असते.

इन्फो

अपुऱ्या झोपेचे तोटे

अपुऱ्या झोपेमुळे कुणालाही दिवसभर उत्साह वाटत नाही. शरीर सतत जड असल्यासारखे वाटल्याने कामात तत्परता दाखवता येत नाही. तसेच एकूणातच चैतन्याचा अभाव वाटण्याने कोणतेही काम नीटपणे होत नाही. झोप अपुरी झाल्याने काहींना आळस येऊन दिवसभर जांभया येणे, चिडचिड होणे, जळजळ होणे, डोळ्यांना त्रास होणे यासह विविध प्रकारचे त्रास संभवतात.

Web Title: Lack of sleep lowers the immune system of many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.