जलसाठा कमी ; तर शहरात एकवेळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:06 AM2019-06-23T01:06:58+5:302019-06-23T01:07:21+5:30
गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली.
नाशिक : गंगापूर धरण आता तळ गाठत असून, जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. याठिकाणी चर खोदण्याचे काम सुरू असून, तेदेखील तातडीने पूर्ण करावे तसेच या ठिकाणी असलेला खडकाचा अडथळादेखील आताच काढावा अशाप्रकारची सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गंगापूर धरणातील जलसाठा कमी होत असून, पाऊसदेखील पडत नसल्याने सध्या शहरावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. नाशिक शहराला ३० जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी असले तरी पावसाची एकंदरच स्थिती बघता कोणत्याही क्षणी पाणी कपात होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गंगापूर धरणात सध्या असलेले पाणी हे जलविहिरीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्याचे काम सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.२२) पाहणी दौरा केला आणि परिस्थितीची पाहणी केली.
गंगापूर धरणात सध्या ९०० दशलक्षघनफूट पाणी शिल्लक असून, त्यातील साडेपाचशे दशलक्षघनफूट पाणी नाशिक महापालिकेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल अशाप्रकारचे नियोजन आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाबत लक्षात घेता शहरातील ज्या भागात दोन वेळ पाणीपुरवठा होत आहे, तेथे एकवेळ पाणीपुरवठा करता येईल काय, त्या भागांमध्ये एकवेळच परंतु ज्यादा दाबाने पाणीपुरवठा कसा करता येईल, त्याचे नियोजन करून आठ दिवसांत पाणीपुरवठा विभागाने अहवाल सादर करावा, असे आदेश दिल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. तर नदीपात्रात चर खोदण्यासंदर्भात आपणच पत्र दिले होते. पाण्याचे सूयोग्य नियोजन केले पाहिजे, असे मत सभागृह नेता दिनकर पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनसे गटनेता सलीम शेख, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. तसेच अधीक्षक अभियंता नलावडे, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, अविनाश धनाईत आदी उपस्थित होते.
शिवसेना तयार, मात्र आपसातच गोंधळ
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही तसेच पाऊस कमी झाल्याने पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. शहर हिताचा विचार करता राजकारण न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. तथापि, गटनेता विलास शिंदे यांनी दौºयाकडे पाठ फिरविली. अगोदरच पाण्याचे नियोजन करण्याची गरज असताना तसे न केल्याने ही वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी धरणात जलपूजन करण्यास महापौरांनी वेळ दिला नाही त्यामुळे आता ही वेळ आली असून, सांगून हा एकप्रकारे गोदामातेचा प्रकोपच असल्याचे नमूद केले.
आयुक्तांची दांडी आणि पाटील यांची नाराजी
महापौर रंजना भानसी तसेच अन्य सर्व पदाधिकारी गंगापूर धरणाच्या पाहणी दौºयासाठी गेले असताना आयुक्त राधाकृष्ण गमे मात्र या दौºयात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे सभागृहनेता दिनकर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व पदाधिकारी आले असतानादेखील आयुक्तउपस्थित राहत नाही हे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेस पक्षाचे गटनेते शाहू खैरे तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, अपक्षांचे गटनेते गुरूमित बग्गा आदिंनीदेखील या दौºयाकडे पाठ फिरविली. महासभेतील त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले.