पंधरा वर्षापासून लखमापूर गावाला पोलीसपाटीलच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 08:33 PM2020-10-08T20:33:39+5:302020-10-09T01:04:03+5:30
लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे.
लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर हे गाव तालुक्यात औद्योगिक क्षेत्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. परंतु गावाला हक्काचे पोलिसपाटील नसल्याने विविध दाखल्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. तेव्हा या गावाला हक्काचे पोलिस पाटील केव्हा मिळणार. अशी मागणी सध्या जोर धरीत आहे. प्राचीन काळापासून गावाचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी कायद्याची माहिती असलेल्या धाडसी व्यक्ती महत्त्व म्हणजे गावचे पोलीसपाटील त्यामुळे गावगाडा चालवत असताना न्याय पूर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे नावारु पाला आलेली आहेत. पोलीसपाटील पदाचा इतिहास हा काही कायदा कलमानुसार अधिनियमीत आहे. पहिला कायदा 1867 साली मुंबई ग्राम पोलीस अधिनियम या नावाने अमलात आणला. या कायद्याच्या तरतुदीनुसार पोलीस पाटील पद हे वंशपरंपरागत होते. त्याकाळी ते गावातील न्यायनिवाडा पासून ते महसूल गोळा करण्या पर्यंतची सर्व कामे पाटील करायचे. परंतु 15आॅगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांची नेमलेली वंशपरंपरागत पाटीलकी पदे रद्द करण्यात आली. त्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1962 पासून ही वंशपरंपरागत पध्दती ख-या अर्थाने रद्द करावी ही मागणी होती. पोलीसपाटील पदाला खरी राजमुद्रीत मान्यता17 डिसेंबर 1967 रोजी मिळाली.
पोलीसपाटलांची गावासाठीची भूमिकाही महत्त्वाची मानली जाते. गावात जर काही, भांडणे, तंटे, विविध स्वरु पाचे वाद विवाद, शेती विषयक भांडणे इ.गाव पातळीवर मिटविण्यासाठी योग्य न्याय निवडा देण्याचे काम त्या त्या गावाचे पोलीसपाटील हे करीत होते. गावातील तंटा मुक्तीसाठी पोलीसपाटील यांची भुमीका महत्त्वाची मानली जाते.
नाशिक जिल्ह्यात 1680 पोलीसपाटील विविध गावात कार्यरत आहेत. अजून 300 ते 350 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. तसेच दिंडोरी तालुक्यात सध्या 132 पोलीसपाटील असून 25 पदे रिक्त आहेत. लखमापूर गावात साधारणपणे 15 वर्षांपासून पोलीसपाटील पद रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गास व इतर नागरिकांना जर पोलीसपाटीलांचा दाखला लागत असल्यास ते मिळविणे अवघड होऊन जाते. तेव्हा लखमापूर गावासाठी स्थानिक कायम स्वरूपी पोलीसपाटील यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पोलीसपाटील पद ज्या गावात रिक्त आहेत, ते लवकर भरण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. कारण गावाचा व शासनाचा मुख्य आधार असतो. त्यासाठी आम्ही आताच काही शासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या या संदर्भात भेटी घेऊन, याबाबतीत चर्चा केली आहे. दिंडोरी तालुक्यात ज्या गावांमध्ये पोलीसपाटील नाही. त्या गावामध्ये शासनाच्या आदेशाने ते पद नेमणूकीसाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.
- चिंतामण पाटील, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पोलीसपाटील संघटना