गंगापूररोडवर घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:07 AM2018-10-31T00:07:20+5:302018-10-31T00:07:44+5:30

सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़

 Lakhs of lakhs of rupees in Gangapur Road | गंगापूररोडवर घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

गंगापूररोडवर घरफोडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

Next

नाशिक : सहा लाखांची रोकड, सोळा लाखांचे मोबाइल यानंतरही पोलिसांनी धडा घेतलेला नसून गंगापूररोड परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच आहे़ या घटनांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे़ त्यातच गंगापूररोड परिसरात आणखी दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून, सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़  गंगापूररोडवरील नवशा गणपतीनगरमध्ये असलेल्या आयुर्वेदन बंगल्यातील किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ दीपक सुधाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत त्यांच्या बंद बंगल्याच्या किचनच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील ९़२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२़६७ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे नेकलेस, १७.१९ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चेन, ८़९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, दोन हिऱ्याच्या अंगठ्या, मोत्याच्या दागिन्यांचा सेट व इतर दागिने असा १ लाख ९६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लक्ष्मीनिवास सोसायटी, गंगापूररोड
गंगापूररोडवरील जनलक्ष्मी बँकेच्या पाठीमागील लक्ष्मीनिवास सोसायटीतील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे पाऊण लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चोरट्यांनी शांतिलाल तुळशीराम पवार (७७) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील सोन्याच्या बाळ्या, झुमके, अंगठी, टॉप्स, रामपान, चांदीच्या वस्तू, निरंजन, करंडा, लक्ष्मीमूर्ती, वाट्या, चांदीचे मेडल, जोडवे, पादुका, १४ हजार रुपयांची रोकड, लॉकरच्या चाव्या असा ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Lakhs of lakhs of rupees in Gangapur Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.