तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:57 AM2017-10-31T00:57:56+5:302017-10-31T01:01:07+5:30

शहरात घरफोडी सत्र सुरू असून, दिवाळीसाठी घरी परतणारे कुटुंबीय जसजसे घरी परतत आहेत तसतशा घरफोड्या झाल्याचे समोर येत आहेत़ शहरातील विविध तीन ठिकाणी घरफोडींच्या घटना उघडकीस आल्या असून, यामध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे़

Lakhs of lakhs in three houses | तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

तीन घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

Next

नाशिक : शहरात घरफोडी सत्र सुरू असून, दिवाळीसाठी घरी परतणारे कुटुंबीय जसजसे घरी परतत आहेत तसतशा घरफोड्या झाल्याचे समोर येत आहेत़ शहरातील विविध तीन ठिकाणी घरफोडींच्या घटना उघडकीस आल्या असून, यामध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे़  आडगावच्या निवृत्तिनगर परिसरातील शरयू पार्क परिसरातील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ राजेंद्र रघुनाथ पितृभक्त (५६, रा़ फ्लॅट नंबर २, गणेश प्राइड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि़२९) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा लॉक तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरात ठेवलेले आठ तोळे वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, चार तोळे वजनाची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅम वजनाचे सात वेढे व रोख रक्कम असा एक लाख ९१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमधील रविकिरण कॉलनीतील एका घराचे खिडकीचे गज कापून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज चोरून नेला आहे़ साई संकुल रो-हाउसमधील रहिवासी भटेंद्रनाथ पंडितराव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरातील २५ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, पाच व तीन ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, आठ ग्रॅमचे कानातील झुबे, सहा ग्रॅमचे सोन्याचे वेल, दोन ग्रॅम वजनाची सटी, पन्नास ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पट्ट्या व रोख रक्कम असा एक लाख ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 
घरफोडीची आणखी घटना गणेशनगरमध्ये घडली आहे़ मंत्री अपार्टमेंटमधील रहिवासी डॉ़ नीलेश लीलाधर फुलझले हे २१ ते २८ या कालावधीत दिवाळीनिमित्त भंडारा येथे गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा व लॅचचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Lakhs of lakhs in three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.