अलंगुण येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:21 PM2020-07-25T17:21:20+5:302020-07-25T17:22:30+5:30

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Lakhs lost due to fire at Alangun house | अलंगुण येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान

अलंगुण येथील घराला आग लागून लाखोंचे नुकसान

Next
ठळक मुद्देआगीत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील बसस्टँड जवळ राहणारे पांडुरंग झिप्रा महाले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदरच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु जीवनावश्यक वस्तूंचे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात घठलेल्या या घटनेमुळे महाले यांचे कुटुंब पुरते हवालदिल झाले असून आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यांचा पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, येथील पांडुरंग झिप्रा महाले (५५) यांच्या घराला शुक्र वारी (दि.२५) रोजी सकाळी नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. यात तांदूळ, गहू, नागली, तूर, उडीद, कुळीद आदी धान्य व कडधान्येसह दूरदर्शन संच, मोबाईल, वापरातील कपडे, लाकडी मांडणी, सिमेंटी पत्रे, छपराचे लाकडी वासे, वह्या-पुस्तके आदी वस्तू जळून खाक झाल्यात.
सदर घटनेची माहिती समजताच माजी आमदार जे. पी. गावित, वसंत बागुल, पांडुरंग भोये, पोलीस पाटील आनंदा गावित, पांडुरंग महाले, टी. के. महाले, यशवंत गावित, यशवंत भोये, शिवराम भोये आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह तरु णांनी आग विझवण्यासाठी मदत केली.
सदर घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विजय सूर्यवंशी, नायब तहसीलदार एस. आर. बकरे यांनी तातडीने दखल घेऊन तलाठी एम. डी. गायकवाड यांच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला आहे.

Web Title: Lakhs lost due to fire at Alangun house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.