चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: October 20, 2015 11:33 PM2015-10-20T23:33:03+5:302015-10-20T23:33:36+5:30

चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

Lakhs of millions of lives in theft cases | चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

चोरीच्या घटनांमध्ये लाखांचा ऐवज लंपास

Next

नाशिक : शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, यातून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयही सुटलेले नाही़ आडगाव, भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील चार चोऱ्यांमध्ये सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़
विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात राहणारे ज्ञानेश्वर गणपत जाधव (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली़, तर दुसरी चोरीची घटना कन्नमवार पुलाजवळील धनराज कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे़ केतन किशोर देशमुख यांच्या घरातून सॅमसंग कंपनीचा टॅब चोरट्यांनी चोरून नेला़
तिसरी घटना धात्रक फाट्यावरील प्रशांत तुकाराम वडघणे (१९) यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करीत चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाइल असा ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ चौथी घटना कालिका देवी मंदिर परिसरात घडली आहे़ देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या माया वसंत चौधरी या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Lakhs of millions of lives in theft cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.