पतसंस्था कर्मचाऱ्याच्या हातून पळवली लाखाची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 12:20 AM2022-01-25T00:20:09+5:302022-01-25T00:20:29+5:30

सिन्नर : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच रस्त्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूमस्टाईल पोबारा केला. सोमवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास सिध्दीविनायक हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

Lakhs of cash snatched from a credit union employee | पतसंस्था कर्मचाऱ्याच्या हातून पळवली लाखाची रोकड

पतसंस्था कर्मचाऱ्याच्या हातून पळवली लाखाची रोकड

Next
ठळक मुद्देसिन्नर: दुपारी एक वाजेची घटना

सिन्नर : पतसंस्थेचा रोखपाल एक लाख रुपयांची रक्कम घेऊन पतसंस्थेत जात असतानाच रस्त्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रक्कम असलेली पिशवी हिसकावून धूमस्टाईल पोबारा केला. सोमवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास सिध्दीविनायक हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

सोनांबे येथील गोवर्धन पतसंस्थेची सिन्नर येथे सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या इमारतीत शाखा असून संस्थेचे रोखपाल संजय किसन जाधव यांनी सूर्योदय संकुलमधील नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेतून एक लाखांची रक्कम काढली. ही रक्कम एका पिशवीत गुंडाळून ते पतसंस्थेकडे जात असताना यशवंत डायग्नॉस्टिकसमोर समोरुन मोटारसायकलवरून आलेले चोरटे त्यांना आडवे झाले. काही कळण्याच्या आत चोरट्यांनी जाधव यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून शिवाजीनगरकडे पोबारा केला.
जाधव यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. नागरिकही जमा झाले. मात्र चोरटे क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले होते. जाधव यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय माळी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Lakhs of cash snatched from a credit union employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.