खरेदीत गुंतलेल्या युवतीच्या बॅगमधून एक लाख रुपये लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:47 AM2017-08-24T00:47:26+5:302017-08-24T00:47:33+5:30
शहरातील बसस्थानकासमोरील निकिता लेडिज आर्टिकल या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेतून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आला. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या बॅगेतून एक १८ ते २० वयोगटातील तरुणी बॅग कापून पैसे चोरताना स्पष्ट दिसत आहे.
सटाणा : शहरातील बसस्थानकासमोरील निकिता लेडिज आर्टिकल या दुकानात खरेदीसाठी आलेल्या युवतीच्या बॅगेतून १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आला. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाच्या काउंटरवर ठेवलेल्या बॅगेतून एक १८ ते २० वयोगटातील तरुणी बॅग कापून पैसे चोरताना स्पष्ट दिसत आहे. त्या चोरट्या मुलीसोबत एक बालकदेखील असल्याचे कॅमेºयात कैद झाले आहे. बॅग कापून पैसे चोरी करताच त्या तरु णीने त्या बालकाकडे पैसे दिल्याचेही स्पष्ट दिसत आहे. एक लाख रुपये घेऊन ते बालक दुकानातून निघून जाताच त्या चोरट्या तरुणीने तिच्या स्वत:च्या पर्समधून पाचशे रुपयांची नोट काढून दहा रुपयांच्या पिनांची मागणी केली; मात्र दुकानदाराने सुट्टे नसल्याचे सांगताच डोक्याला हात लावत ती तरुणी दुकानातून निघून गेल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सटाणा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून, गुन्हा दाखल केला आहे.
बॅँकेतून काढले होते पैसे
तालुक्यातील चौंधाणे येथील शेतकरी किशोर मोरे यांना कांदा विक्र ीचे पैसे खात्यावर पडल्याचा मेसेज आला म्हणून सटाणा महाविद्यालयात टीवायबीएस्सीला जाणारी त्यांची कन्या माधुरी मोरे हिच्याकडे बँक आॅफ महाराष्ट्र, सटाणा शाखेचा धनादेश दिला होता. माधुरी हिने बँकेत जाऊन एक लाख रु पये काढले आणि ती खरेदीसाठी निकिता लेडिज आर्टिकलमध्ये आली होती. तिच्यासोबत तिची काकूही होती; मात्र खरेदीमध्ये गुंग झाल्याचा फायदा घेत चोरट्या युवतीने हातोहात एक लाख रु पये घेऊन पोबारा केला.