घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:31 AM2019-06-23T00:31:32+5:302019-06-23T00:31:47+5:30

जेलरोड हनुमंतनगर व जयभवानीरोड कमला पार्क येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला.

 Lakhs of three lakh rupees | घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

Next

नाशिकरोड : जेलरोड हनुमंतनगर व जयभवानीरोड कमला पार्क येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. जेलरोड जुना सायखेडारोड हनुमंतनगरमध्ये राहाणारे जगदीश हनुमंत चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चोरट्याने बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि तीन तोळ्याची सोन्याची मोहनमाळ, १ तोळे सोन्याचे वेढे, अर्ध्या तोळ्याची अंगठी, दोन तोळ्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याची शिवमुद्रा, अर्धा तोळ्याचे सोन्याचे टॉप असे साडेसात तोळ्याचे दागिने व ३५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तर दुसऱ्या एका घटनेत जयभवानीरोड कमला पार्क येथील बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. जयभवानीरोड कमला पार्क रोहाउस ४ मध्ये राहणारे नरेंद्र कर्मा ठाकरे यांची पत्नी मयत झाल्याने साक्री तालुक्यातील देगाव येथे अंत्यविधीसाठी गेले होते. शनिवारी सकाळी ठाकरे यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्यांना बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्यावरून ठाकरे यांचे काका जगन्नाथ रामा ठाकरे यांनी येऊन बघितले असता घरातील सामान सर्व अस्ताव्यस्त पडलेले होते. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी अडीच तोळ्याची सोन्याची साखळी, अर्ध्या तोळ्याचे लहान मुलांचे कानातले, ओम पान व २० हजार रुपये रोख असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोड्या व चोºयांमुळे सर्वत्र भीती पसरली आहे.
अगोदरच
दिली माहिती
जयभवानीरोड कमला पार्क येथे रात्रीच्या सुमारास काही अनोळखी इसम फिरत असल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेºयात चौघे संशयित काहीतरी हत्यारे हातात घेऊन फिरत असल्याचे कैद झाले होते. याबाबत रहिवाशांनी उपनगर पोलिसांना पत्र देऊन माहिती सुद्धा दिली होती. मात्र योग्य खबरदारी व गस्त न वाढवल्याने चोरटे घरफोडी करण्यात यशस्वी झाले.

Web Title:  Lakhs of three lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.