अतिदुर्गम भागातील लेकींना मिळाला ज्ञानाचा खजिना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 04:11 PM2020-09-18T16:11:09+5:302020-09-18T16:12:18+5:30
पेठ : शाळा बंद शिक्षण सुरू असले तरी घरी राहून अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची आवश्यकता लक्षात घेऊन पेठ तालुक्यातील शिक्षक व दिडोंरीचे पोलीस अधिकारी यांच्या सामाजिक दायित्वातून पेठ च्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील ३७ मुलींना इयत्ता ९ व १० वी चे पुस्तके प्राप्त करून देण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील १०० शाळाबाह्य मुलींना ज्ञानदान केले जाते. समग्र शिक्षा अभियान मधून ८ वी पर्यंतच्या मुलींना मोफत पाठयपुस्तके प्राप्त झाली. मात्र ९ वी व १० वी च्या मुलींना पुस्तके खरेदी करणे शक्य नसल्याने त्यांच्या अध्ययन-अध्यापनात खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ‘डोनेट अ बुक’ या मोहीमेतंर्गत गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पेठ तालुक्यातील शिक्षकांनी 1१९४७४ रूपये तर दिंडोरीचे पोलीस निरिक्षक अनिलकुमार बोरसे यांनी २१०० रु पयाच्या मदतीतून ३७ मुलींना क्रमिक पुस्तके खरेदी करून वाटप करण्यात आले. यामुळे वाडी-वस्तीवर ज्ञानाचे धडे गिरवणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा शिक्षणातील अडसर दूर झाला आहे.
प्रतिक्रि या...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या संकल्पनेतून ‘डोनेट अ बूक’ अभियानातंर्गत केलेल्या आवाहनाला शिक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत जवळपास २१५७४ रूपयाचा निधी उभारून केजीबीव्ही च्या ३७ मुलींना बालभारती मधून पुस्तके खरेदी करून वाटप करण्यात आली.
- सरोज जगताप, गट शिक्षणाधिकारी, पेठ.