लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:41 PM2020-10-06T23:41:44+5:302020-10-07T01:08:12+5:30

देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चाके तब्बल सहा महिने होऊनही जागेवरच आहेत. मात्र, आता ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध यांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

Lalpari passengers are still waiting | लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच

लालपरीची प्रवाशांना अजूनही प्रतीक्षाच

Next
ठळक मुद्देगैरसोय : बससेवा सुरू करण्याची मागणी

देवगाव : ग्रामीण भागाच्या जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची चाके अजूनही ग्रामीण भागात धावू न शकल्याने प्रवाशांना आता लालपरीची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर रस्त्यावरून धावणारी एसटी जागेवरच थांबवावी लागली. तेव्हापासून थांबलेली चाके तब्बल सहा महिने होऊनही जागेवरच आहेत. मात्र, आता ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध यांना लालपरीची प्रकर्षाने जाणीव होत आहे. परंतु, गावातच नाही तर रस्त्यावरून लाल रंगाची बस दिसेनाशी झाली आहे. शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून एसटी बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील एसटी बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना एसटी बसची गरज भासत आहे. परंतु बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी बसची वाहतूक सुरळीत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक प्रवासी ग्रामस्थ यांना सुरक्षित जाण्या-येण्यासाठी आज बससेवा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात बससेवा चालू नसल्याने ग्रामीण भागात दैनंदिन वृत्तपत्र, पत्रव्यवहार, टपाल सेवा, शासकीय दस्तऐवज आदी सेवांची सातत्याने गैरसोय होत असल्याने लालपरी सुरू करण्याचा जोर मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

Web Title: Lalpari passengers are still waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.