घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 01:23 AM2021-11-04T01:23:44+5:302021-11-04T01:24:43+5:30
शहरात सणासुदीच्या काळात घरफोडीची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, चोरट्यांनी लॅपटॉप आाणि सोन्याचांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव आाणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरात सणासुदीच्या काळात घरफोडीची मालिका सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणेदोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश असून, चोरट्यांनी लॅपटॉप आाणि सोन्याचांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव आाणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृतधाम परिसरातील संदीप नामदेव चौरे (रा. गंगोत्री कॉलनी, बिडी कामगार नगर) हे घराबाहेर पडले असता, चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून हॉलमधून सुमारे २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना शरणपूररोड भागात घडली. या ठिकाणी एकास सोसायटीतील दोन सदनिका चोरट्यांनी फोडल्या. पी ॲन्ड टी कॉलनीत राहणाऱ्या स्नेहा गजेंद्र चौधरी (रा. विशाखा सोसायटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी कुटुंबीय आणि शेजारी नयनसिंग क्षत्रिय यांचे कुटुंबीय सोमवारी (दि. १) बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी दोघांच्या बंद सदनिकांचे लॅचलॉक तोडून एकाच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल आणि मनगटी घड्याळ असा सुमारे १ लाख ६२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.