बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:54 PM2020-08-28T23:54:40+5:302020-08-29T00:13:40+5:30
जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर येथे एका बंद घराचा कडीकोयंडा उघडून चोरट्याने ५० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकरोड : जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर येथे एका बंद घराचा कडीकोयंडा उघडून चोरट्याने ५० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. गारवा रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या वंदना शिवाजी निकम व त्यांची मुले गुरु वारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्याने बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून कपाटातील एक तोळ्याचे मंगळसूत्र, चांदीचा छल्ला, मोबाइल असा ४७ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूक करण्यास सांगत महिलेस गंडा
नाशिकरोड : विहितगाव येथील महिलेस शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास दहा टक्के नफा देईल, असे सांगून ७५ हजार रु पये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहितगाव लॅमरोड ठाकूर प्लाझा येथे राहणा-या शुभांगी अनिल शिंदे या नणंदेचा पुतण्या नीलेश किसन तासकर (२८, रा. साक्षी अपार्टमेन्ट, बोधलेनगर) यांच्या घरी गेल्या होत्या. नीलेशने शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून दहा ते पंधरा टक्के नफा मिळतो असे सांगून ७५ हजार घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.