उद्योगनगर परिसरात २५ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:55 PM2020-08-04T20:55:28+5:302020-08-05T01:08:04+5:30

सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले.

Lampas worth Rs 25,000 in Udyognagar area | उद्योगनगर परिसरात २५ हजारांचा ऐवज लंपास

उद्योगनगर परिसरात २५ हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्दे परिसरात चोरट्यांची शोधाशोध घेण्यात आली.

सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले.
नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या इमारतीचे ज्ञानदा पार्क परिसरात काम सुरू आहे. पावसामुळे कामावरील सुरक्षारक्षक नव्या इमारतीत झोपल्याचा फायदा घेऊन पत्र्याच्या गोडावूनमधील स्टील कटिंगचे मशिन किंमत अंदाजे दहा हजार, बायडिंग वायरचे २० किलोचे तीन ते चार बंडल घेऊन चोरटे फरार झाले. अशाच दुर्स­या बांधकामावरील सुरक्षारक्षक सखाराम साठे जवळच्या इमारतीत झोपले असताना त्यांच्या पत्र्याच्या घरामधील रोख साडेपाच हजार चोरट्यांच्या हाती लागले. घरातील नवे भांडे, 2-3 नव्या साड्या व रक्षाबंधनासाठी मुलांना आणलेले नवे कपडे घेऊन चोरटे फरार झाले. पत्र्यांचा आवाज ऐकून साठे जागे झाले. मात्र तीन चोरटे दिसल्याने त्यांनी घाबरून शांत रहाणे पसंत केले. चोरटे गेल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या रहिवाशांना आवाज देऊन उठवले. त्यानंतर परिसरात चोरट्यांची शोधाशोध घेण्यात आली. मात्र चोरटे चोरटे फरार झाले होते.

Web Title: Lampas worth Rs 25,000 in Udyognagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.