भुजबळ कुटुंबीयांना भूखंड जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:02 AM2018-04-12T05:02:17+5:302018-04-12T05:02:17+5:30

महाराष्ट्र सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये गजाआड असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली.

Land confiscation notice to Bhujbal family | भुजबळ कुटुंबीयांना भूखंड जप्तीची नोटीस

भुजबळ कुटुंबीयांना भूखंड जप्तीची नोटीस

Next

नाशिक : महाराष्ट्र सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये गजाआड असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली. यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
शिलापूर शिवारात असलेल्या या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने ही जप्तीची नोटीस बजावली आहे. आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे समीर तसेच पंकज भुजबळ आणि सत्येन आप्पा केसरकर हे संचालक आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या चिपाड तसेच अन्य साहित्यापासून वीजनिर्मिती करणारी कंपनी सुरू झाली आणि नंतर बंदही पडली. या कंपनीसाठी कर्ज काढताना नाशिक मर्चंट बॅँकेकडे जमीन गहाण ठेवण्यात आली होती. तालुक्यातील सर्व्हे नंबर ७९५/३पैकी २३ आणि ६ हे गट नंबर शेफाली भुजबळ तर ४ व ५ हे गट विशाखा भुजबळ यांच्या नावावर आहेत. या पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हजार २५० चौरस मीटर असून आॅफिसचे क्षेत्र ६००.४७ चौरसमीटर इतके आहे.
>प्रतीकात्मक ताबा
थकबाकी भरण्यासाठी नाशिक मर्चंट बँकेने १ एप्रिल २०१७पासून कर्ज परतफेड करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे ९ एप्रिल रोजी कलम १३(४) नियम ९ अन्वये प्रतीकात्मक ताबा घेतला आहे.
१ एप्रिल २०१७पासून थकीत रकमेसह परतफेड करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Land confiscation notice to Bhujbal family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.