लेंडेझरी वनपरिक्षेत्रात गैरव्यवहार ?
By Admin | Published: October 26, 2016 12:47 AM2016-10-26T00:47:39+5:302016-10-26T01:00:02+5:30
लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील विविध कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती आहे.
गंगापूर : येथे आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेला मूक मोर्चा शांततेत पार पडला. जिल्हाभरातून आलेले पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, मुलींच्या सहभागामुळे गंगापुरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
कोपर्डी प्रकरण जलदगती चालवून सहा महिन्यांच्या आत आरोपींना शिक्षा द्यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी तात्काळ या कायद्यात बदल करण्यात यावा, विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत मिळवण्यासाठी घालण्यात आलेली ६० टक्के गुणाची अट काढून विनाअट ईबीसी सवलत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात प्रेरणा पाटील, भाग्यश्री नरोडे, सुधा गावंडे, नम्रता देशमुख, शुभांगी देशमुख, तारा झिम्मन, भाग्यश्री यादव या तरुणींनी मनोगत व्यक्त केले. जि.प. शाळेच्या मैदानावरून सुरुवात झालेल्या या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश मंदिर, मारुती चौक, तीनकोनी, राजीव गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे तहसील कार्यालयात या मोर्चाची सांगता झाली. गंगापूर शहरासह मोर्चा निघालेल्या मार्गावर मोठमोठे फलक, झेंडे, लाऊडस्पीकर यंत्रणा, ड्रोन कॅमेरे, वॉकीटॉकीसह पोलीस यंत्रणा, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, सर्व खबरदारीच्या उपाययोजना संयोजकांतर्फे करण्यात आल्या होत्या.
मोर्चामध्ये तालुक्यातील सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली; मात्र व्यासपीठावर केवळ निवेदन देणाऱ्या तरुणींनीच संचलन केले. मोर्चा आटोपताच स्वयंसेवकांनी शहरातील मोर्चाच्या मार्गात स्वच्छता मोहीम राबविली. विशेष म्हणजे या मोर्चात अमन सोशल फाऊंडेशन, व्यापारी महासंघ, आझाद हिंद मंडळ, नाभिक महासंघ, पंचायत नुरानी ग्रुप, ब्राह्मण महासंघाने मोर्चात सहभागी नागरिकांसाठी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.