हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:54+5:302021-06-05T04:10:54+5:30

नायगाव खोऱ्यातील या गावातील बहुतांशी क्षेत्र हे बागायती असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.या प्रस्तावित मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरुन ...

Land survey for high speed railway line started | हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू

हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी सुरू

Next

नायगाव खोऱ्यातील या गावातील बहुतांशी क्षेत्र हे बागायती असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.या प्रस्तावित मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरुन नायगाव शिवारातून आधीही परिसरातून गुळवंच येथील औष्णिक वीज केंद्रासाठी, इंडियाबुल्सच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झाले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या मार्गातील बागायती क्षेत्र वगळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

इन्फो

असा राहणार प्रस्तावित रेल्वेमार्ग

पुणे, हडपसर, वाघोली, कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड, असा नवीन रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे. २३५ किलोमीटर अंतराच्या या रेल्वेमार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे १,३०० हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे. भांबुरवाडी, जैदवाडी (ता. खेड), नांदूर, विठ्ठलवाडी (ता. आंबेगाव), नगदवाडी, संतवाडी (ता. जुन्नर), नांदूर खंदारमाळ, साकूर, बांबळेवाडी, रणखांबवाडी, नांदूर शिंगोटे, सुंदरपूर असे २०.६२ कि.मी. लांबीचे एकूण १२ बोगदे (टनेल) बांधण्यात येणार आहेत. मुळा-मुठा, इंद्रायणी, भामा, भीमा, घोड, मीना, कुकडी, कास, मुळा, प्रवरा, दारणा आदी नद्यांवर मिळून १५ पूल बांधण्यात येणार आहेत. यापैकी सर्वात मोठा २५० मीटर लांबीचा पूल मुळा-मुठा नदीवर बांधण्यात येणार आहे.

--------------------------

इन्फो

१) २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग

२) पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून रेल्वे मार्ग

३) २०० किलोमीटर प्रतितास वेग

४) पुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासांत कापणार.

५) पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानके

६) १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल

७) १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित

८) रेल्वे स्थानकात स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.

९) एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाइनचे बांधकाम

----------------------------------------------

फोटो - ०४ हायस्पीड रेल्वे-१

सिन्नर तालुक्यातील देशवंडी परिसरात नाशिक - पुणे रेल्वे मार्गाची मोजणी करताना कर्मचारी व अधिकारी.

फोटो - ०४ हायस्पीड रेल्वे-२

भूसंपादन अंतराच्या खुणा तयार करताना कर्मचारी.

===Photopath===

040621\04nsk_16_04062021_13.jpg~040621\04nsk_18_04062021_13.jpg

===Caption===

फोटो - ०४ हायस्पीड रेल्वे-१~फोटो - ०४ हायस्पीड रेल्वे-२

Web Title: Land survey for high speed railway line started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.