भूखंड भाडेकरार, तारीख पे तारीख
By admin | Published: June 19, 2015 11:41 PM2015-06-19T23:41:38+5:302015-06-19T23:41:57+5:30
जिल्हा परिषद : आता १७ जुलैला होणार सुनावणी
नाशिक : शहराच्या मध्यवस्तीत असलेला जिल्हा परिषदेचा मोक्याच्या जागेवरील भूखंड भाडेतत्त्वावर दिल्यानंतर तो खाली न केल्याने न्यायालयात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या नशिबी केवळ ‘तारीख पे तारीख’ येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा न्यायालयात याबाबत दोेन दिवसांपूर्वी सुनावणीच्या वेळी न्यायालय रजेवर असल्याने याप्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. आता ही सुनावणी १७ जुलै रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मालकीचा महात्मा गांधी रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगत एक महत्त्वाच्या जागेवर कोट्यवधी रुपयांचा भूखंड आहे. तत्कालीन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गिते यांच्या काळात हा भूखंड पारख इलेक्ट्रॉनिक्स नामक व्यापाऱ्याला ११ महिन्यांच्या करारावर देण्यात आला होता.
त्याचवेळी संबंधित व्यावसायिकाने उच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला स्थगिती मिळवित याप्रकरणाची सुनावणी नाशिकलाच जिल्हा न्यायालयात सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने त्यांच्या कायदेशीर सल्लागारांमध्ये खांदेपालट करूनही जिल्हा परिषदेच्या नशिबी तारीख पे तारीख येत असल्याचे चित्र असून, आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे.