जमिनी दिल्या, कालवा झाला...पाणी मोबदला मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:12 PM2020-09-19T23:12:36+5:302020-09-20T00:39:47+5:30

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली.

Land was given, canal was built ... water was not paid | जमिनी दिल्या, कालवा झाला...पाणी मोबदला मिळालाच नाही

पुनंद प्रकल्प

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या तक्रारी : सुळे उजव्या कालव्याच्या कामाचा आराखडा करुन त्रुटी दूर करणार

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यात त्रुटी असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकदाही पाण्याचा लाभ मिळाला नाही.कालव्याला जमिनी दिल्या मात्र अल्प मोबदला मिळाला, अद्याप पाण्याचा लाभ मिळाला नसल्याची कैफियत शेतकºयांनी मांडली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशान्वये आमदार नितीन पवार यांच्या समवेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ए जीं मोरे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कायर्कारी अभियंता तुषार पाटील यांनी कालव्याची पहाणी करुन २१ किमीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीची पहाणी करुन शेतकºयांशी संवाद साधला.सुळे उजव्या कालव्याच्या निविदेत असलेली व प्रत्यक्षात झालेली कामे यांचा आराखडा करुन पाणी पोहोचण्यास येणाºया अडचणी दूर करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याचे यावेळी यंत्रणेने सांगितले.
कालव्यातील त्रुटी दूर करा, सिद्धेश्वर बंधाºयांची उंची वाढवा पण पाटविहीर पर्यंत पाणी पोहोचवा अशी सूचना आमदार पवार यांनी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला केली. कालव्याचे कामे पूर्ण झाले मात्र योग्य केली नसल्यामुळे व पाणी वाहण्यासाठी योग्य चढ उतार नसल्याने कमी दाबाने पाणी येते त्यामुळे शेवटपर्यंत पोहचत नसल्याचे यावेळी निदशर्नास आले. पाणी सोडल्यानंतर कालव्यात लोखंडी पाईप टाकलेल्या ठिकठिकाणी व सिमेंटच्या नित्कृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे पाणी झिरपते, पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे शेतपिकांचे नुकसान होते, पाणी कमी दाबाने जात असल्यामुळे पुढे पोहोचत नाही अशा गंभीर तक्रारी शेतकºयांनी केल्या.सिद्धेश्वर,पिंपळा, मोहबारी, ईंशी, धार्डेदिगर, पाडगण,नाळीद, भांडणे, रवळजी, देसराणे येथील शेतकºयांच्या तक्रारी जाणून घेत नितीन पवार व यंत्रणेने कालव्याची ठिकठिकाणी पाहणी केली. यावेळी कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, नारायण हिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, उपसभापती विजय शिरसाठ, संदीप वाघ, शिवाजी चौरे, बबन वाघ, मुन्ना वाघ, बाळासाहेब शेवाळे, विनोद भालेराव आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.


 

 

Web Title: Land was given, canal was built ... water was not paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.