भूमापनाचे काम संथगतीने सुरू

By admin | Published: May 31, 2015 01:30 AM2015-05-31T01:30:32+5:302015-05-31T01:31:15+5:30

भूमापनाचे काम संथगतीने सुरू

Landing work started slow down | भूमापनाचे काम संथगतीने सुरू

भूमापनाचे काम संथगतीने सुरू

Next

नाशिक : शहरातील मिळकतींचे भूमापन (सीटी सर्व्हे) करण्यासाठी महापालिकेने भूमिअभिलेख खात्याला निधी देण्याची तयारी दर्शविली खरी; परंतु त्यावेळी ठरलेल्या खर्चापेक्षा तिप्पट खर्च केवळ १७ गावांसाठीच आला आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या असून, सध्या भूमापनाचे काम संथगतीने सुरू आहे.भूतपूर्व नाशिक, नाशिकरोड- देवळाली आणि सातपूर अशा तीन नगरपालिका मिळून ७ नोव्हेंबर १९८२ मध्ये नाशिक महापालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी महापालिका हद्दीत २५ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांचे नगरभूमापन करण्यासाठी शासनाने १० जून १९९४ साली मान्यता दिली. नाशिक मनपाकडे हा प्रस्ताव पाठविल्यानंतर त्यांनीही १९ आॅगस्ट ९४ अन्वये या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर १९९५-९६ पासून सदरचे काम सुरू आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार नाशिक महापालिकेने २५ गावांच्या नगरभूमापनासाठी तीन कोटी ५६ लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. त्यामुळे १९९५-९६ पासून सदरचे काम सुरू करण्यात आले. यासंदर्भात निधी वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत पुन्हा चर्चा झाल्यानंतर मनपाने १२ जुलै ९५ रोजी नगरभूमापनासंदर्भात प्रत्यक्षात जो खर्च येईल तो देण्याची तयारी दर्शविली. मार्च २०१४ पर्यंत महापालिकेने नगरभूमापनासाठी तीन कोटी ५६ लाख ५७ हजार रुपये रक्कम भरली आहे.महापालिकेने सदरची रक्कम नियमित भरणे अपेक्षित असताना कधी रक्कम भरली तर एका वर्षी काहीच भरली नाही. त्यामुळे काम रेंगाळत केले. त्यातच दहा वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असले तरी शहराच्या बांधकाम व्यवसायात अचानक तेजी आली. तसेच शहरीकरण अपेक्षेपेक्षा वाढले. झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत नाशिकचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला म्हणजेच १९९४-९५ मध्ये पालिकेने मिळकतींची जी आकडेवारी दिली होती, त्या मिळकतींच्या संख्येत कैकपटीने वाढ झाली असून, सध्या तर साडेचार लाखांहून अधिक मिळकती झाल्या आहेत. त्यामुळे गावठाण परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने नगरभूमापनाला अधिक परिश्रम घ्यावे लागत आहेत.सद्यस्थितीत पाथर्डी, चुंचाळे, सातपूर, वडाळा, पंचक, दाढेगाव, कामटवाडे, विहितगाव, देवळाली, दसक, नांदूरदसक, पिंपळगाव बहुला, आगार टाकळी, चेहेडी बुद्रूक, चाडेगाव, आनंदवल्ली, गंगापूर अशा १७ गावांचे परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून, त्यासाठी भूमिअभिलेख विभागाला दहा कोटी दहा लाख ९५ हजार १२२ रुपये खर्च आला आहे. उर्वरित आठ गावांच्या भूमापनाचे काम सुरू असले तरी अगोदरच दहा कोटी रुपयांवर खर्च झाला असून, पालिकेकडून मात्र साडेतीन कोटी रुपयांवर कोणतीही रक्कम न देता हात आखडता घेण्यात आला आहे. त्यामुळे हे काम रखडले आहे. आता पालिकेने उर्वरित रक्कम दिल्यानंतरच कामाला गती मिळणार असून, त्या दृष्टीने भूमिअभिलेख विभागाचा पत्रव्यवहार सुरू आहे.

Web Title: Landing work started slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.