दरेवाडी येथे भूस्खलन झाल्याने संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 01:35 AM2022-07-11T01:35:22+5:302022-07-11T01:36:16+5:30

इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

Landslide at Darewadi cut off communication | दरेवाडी येथे भूस्खलन झाल्याने संपर्क तुटला

दरेवाडी येथे भूस्खलन झाल्याने संपर्क तुटला

Next
ठळक मुद्देमुख्य रस्त्यावर मातीचे ढिगारे

घोटी : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.

भाम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त प्रमाणात वृष्टी होत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांची तारांबळ उडते. या रस्त्यावर मातीचे ढिगारे साचल्याने मोटारसायकल यात अडकून पडल्या आहेत. तसेच पायी चालणेही अवघडच झाले आहे. दरम्यान, या भागातून मजूरवर्ग घोटी व तालुक्यात मोठ्या प्रमाणात येत असतो. मात्र पर्यायी रस्ता नाही व दुचाकीही जाऊ-येऊ शकत नसल्याने अनेक मजुरांना रविवारी घरीच थांबावे लागले.

रस्ता खचल्याचे कळल्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली. या भूस्खलनामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही समाधानाची बाब होय. या प्रकाराबाबत तहसीलदार व जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली, कर्मचारी मात्र उपस्थित झाले. जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्त्यावरील मातीचे ढिगारे बाजूला करण्याची गरज आहे. परंतु रविवार सुट्टीचा दिवस असल्याचे कारण देत हे काम पुढे ढकलण्यात आले. ________

इन्फो

भाम धरणामुळे पुनर्वसन झालेल्या दरेवाडीकडे जाणारा रस्ता हा पावसामुळे नेहमीच खचत असतो, याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. याबाबत तालुका प्रशासन, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Read in English

Web Title: Landslide at Darewadi cut off communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.