घरफोडीत लांबविले  सव्वा लाखाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:56 AM2019-04-21T00:56:31+5:302019-04-21T00:56:56+5:30

शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून, अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

 Lanyard jewelery | घरफोडीत लांबविले  सव्वा लाखाचे दागिने

घरफोडीत लांबविले  सव्वा लाखाचे दागिने

Next

नाशिक : शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून, अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे.
चोरट्यांसाठी लग्नसराई, सुटीचा हंगाम सुगीचा काळ ठरत असून भरदिवसा तसेच रात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत रोकड, मौल्यवान वस्तू, दागिन्यांवर चोरटे हात साफ करत आहेत. दोन दिवसांपूर्वी सिडकोमधील पाटीलनगर भागात अशाच पद्धतीने घरफोडी करत चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणाप्रताप चौकात घडली. येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (४३) यांचे बंद घराचे कुलूप दोघा अज्ञात संशयितांनी शुक्रवारी (दि.१९) रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तोडले.
घरातील ३ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, मणी, साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे कानातले वेल, आठ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ ग्रॅमचा चांदीच्या तोरड्याचा जोड, १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा सुमारे १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा  ऐवज लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Lanyard jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.