‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:58 AM2017-07-26T00:58:48+5:302017-07-26T00:59:04+5:30

सिन्नर: सनईच्या मंगल सुरांनी मंतरलेल्या वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला.

laokamatavara-saubhaecachaancaa-varasaava | ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर: सनईच्या मंगल सुरांनी मंतरलेल्या वातावरणात अन् सुहृदांच्या अलोट उपस्थितीत ‘लोकमत’च्या सिन्नर विभागीय कार्यालयाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला. शेकडो सिन्नरकरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला! सिन्नर विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त पंचवटी मोटेलच्या मंत्रालय सभागृहात आयोजित ‘पानसुपारी’ समारंभास शेकडो सिन्नरकर सहर्ष उपस्थित राहिले. ‘लोकमत’वरील आपला स्नेह प्रकट करीत शब्दसुमनांनी अलकृंत झालेल्या भावनांचा वर्षाव करताना ‘लोकमत’शी असलेले स्नेहबंध अधिक गहिरे करण्याचे अभिवचनही सिन्नरकरांनी दिले. वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या ‘लीडर’ या विशेषांकाचे यावेळी सर्वांनी मन:पूर्वक कौतुक केले.  या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, सुदामशेठ सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, शिवसेनेचे गटनेते हेमंत वाजे, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, तहसीलदार नितीन गवळी, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पंचायत समितीचे गटनेते संग्राम  कातकाडे, सदस्य जगनपाटील भाबड, विजय गडाख, रवींद्र पगार, बाबासाहेब कांदळकर, अशोक डावरे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, डॉ. बी. एन. नाकोड, नारायण वाजे, गटविकास अधिकारी भारत धिवरे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसीचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, सहायक निरीक्षक मोतीलाल वसावे, वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, शिवसेनेचे शहरप्रमुख गौरव घरटे, गो. स. व्यवहारे, डॉ. विष्णू अत्रे, सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, स्टाईसचे नामकर्ण आवारे,  पंडितराव लोंढे, मीनाक्षी दळवी, सुनील कुंदे, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, नगरसेवक गोविंद लोखंडे, विजय जाधव, सोमनाथ पावसे, पंकज मोरे, रुपेश मुठे, वासंती देशमुख, शीतल कानडी, विजया बर्डे, प्रीती वायचळे, मालती भोळे, सुजाता तेलंग, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे, निरुपमा शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, वावीचे उपसरपंच विजय काटे, सतीश भुतडा, संतोष जोशी, प्रशांत कर्पे, संजय शेळके, आनंदराव  शेळके, शशिकांत आव्हाड, विनायकराव शेळके, सुनील चकोर, भाजपाचे बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, दीपक बर्के, निमाचे आशिष नहार, सुधीर बडगुजर, किरण खाबिया, प्रवीण वाबळे, एस. के. नायर, सुरेंद्र मिश्रा, डॉ. विजय लोहारकर, डॉ. योगेश उगले, डॉ. भरत गारे, डॉ. भूषण वाघ, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. अभिजित कपोते, डॉ. उमेश येवलेकर, डॉ. पंकज नावंदर, चैतन्य कासार, किरण मुत्रक, नवनाथ मुरडनर, कैलास क्षत्रिय यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, बँकिंग, शिक्षण आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपल्या सदिच्छा दिल्या.
‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी विभागीय कार्यालयात सौ. संगिता व दत्ता दिघोळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. ‘लोकमत’चे सिन्नर तालुका प्रतिनिधी शैलेश कर्पे, कृष्णा वावधाने, वितरक राजेंद्र जाजू, शरद बोंबले, गणेश पगार यांच्यासह लोकमत परिवाराने आभार मानले.

 

Web Title: laokamatavara-saubhaecachaancaa-varasaava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.