विंचूरला स्विफ्ट कारमधून लॅपटॉप लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:12 PM2019-06-29T14:12:27+5:302019-06-29T14:13:06+5:30
विंचूर : येथील येवला रोड लगत असलेल्या ताज हॉटेल समोर उभ्या स्विफ्ट कारची काच फोडून सुमारे दहा हजार किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्र वारी रात्री नऊच्या सुमारास घडली.
विंचूर : येथील येवला रोड लगत असलेल्या ताज हॉटेल समोर उभ्या स्विफ्ट कारची काच फोडून सुमारे दहा हजार किमतीचा लॅपटॉप आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्र वारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी डोके वर काढले असून एक प्रकारे पोलीस प्रशासनाला आव्हान दिले असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. शुक्र वारी घडलेल्या घटनेने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली असून अपुरी पोलीस संख्या बघता येथे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विंचूर गावची लोकसंख्या पंधरा हजाराच्या पुढे गेली असून आजूबाजूला वाढत्या वसाहतींमुळे गाव भौगोलिक दृष्ट्या वाढत असले तरी येथे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने वाड्या-वस्त्यांसह सर्व भार आहेत. परिणामी वाढती लोकवसाहत बघता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येथे कर्मचार्यांची संख्या वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लासलगाव पोलीस ठाण्यात गौरव प्रभाकर केदारे (रा. सुमन नगर, लासलगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.उ.नि लाड, राजेश घुगे, योगेश शिंदे करीत आहे.