निर्यात बंदी उठविल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 09:26 PM2020-12-30T21:26:24+5:302020-12-31T00:12:18+5:30

लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविल्याचा चांगला परिणाम बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा चारशे, तर लाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.

Large increase in onion prices due to lifting of export ban | निर्यात बंदी उठविल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ

निर्यात बंदी उठविल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ

Next
ठळक मुद्देलाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.

लासलगाव : कांदा निर्यातबंदी उठविल्याचा चांगला परिणाम बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा चारशे, तर लाल कांदा चारशे पन्नास रुपयांची तेजी होत विक्री झाला.

बुधवारी (दि.३०) २९४ क्विंटल उन्हाळ कांदा ६०१ ते २,४६० रुपये व सरासरी २,००० रुपये तर ११,४२० क्विंटल लाल कांदा १,१५३ ते २,८६१ व सरासरी २,५५० रुपये भावाने विक्री झाला.
मंगळवारी निर्यात बंदी उठविली, त्यामुळे कांदा भावात तेजी होत लाल कांदा भावात सहाशे रुपयांची वाढ झाली. लासलगाव बाजार समितीचे पहिल्या सत्रात कांदा लिलाव वाहनातील उन्हाळ कांदा किमान ८०१ ते कमाल १,९८१ व सरासरी १,५०० रुपये तर लाल कांदा बाजारभाव क.क. १,००० ते जा.जा. २,६६८ व सरासरी २,४०० रुपये कांदा बाजारभाव होते.
सोमवारी (दि.२८) साठ वाहनातील ६६४ क्विंटल उन्हाळ कांदा ५०० ते १,६८० व सरासरी १,४०० रुपये, तर १,१४७ वाहनातील १४,७१० क्विंटल लाल कांदा १,२०० ते २,०७२ व सरासरी १,९५१ रुपये भाव होता.

Web Title: Large increase in onion prices due to lifting of export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.