ओतुर परीसरात खरीप पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 09:33 PM2019-10-08T21:33:37+5:302019-10-08T21:34:41+5:30

ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर परीसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी परतीचा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.cc

Large losses due to return of kharif crop in Otur area | ओतुर परीसरात खरीप पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान

ओतुर परीसरात खरीप पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान

Next
ठळक मुद्देशेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे.

ओतुर : कळवण तालुक्यातील ओतुर परीसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी परतीचा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ठिकठिकाणी मका व बाजरीचे पिक भुईसपाट झाले आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन दिवसा आड पडणाºया सततच्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. लाल कांद्याची रोपे खराब झाली असुन उन्हाळ कांद्याची रोपेही नष्ट झाली आहेत.
पुन्हा ऊन्हाळी रोपे टाकण्यास पाऊस उघडीप देत नाही. उत्तरा नक्षत्र पाठोपाठ हस्त नक्षत्रानेही जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. शेतकरी वर्गाने महागडी कांदा बियाणे विकत घेतली होती, ती वाया गेली आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होण्याचा संभव आहे. तर काही शेतकरी नविन रोपे टाकणार आहेत. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे. टमाटयाचेही नुकसान झाले आहे.

Web Title: Large losses due to return of kharif crop in Otur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.