जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:21 PM2021-05-18T23:21:25+5:302021-05-19T00:58:33+5:30
नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हजाराच्या आत असलेल्या नवीन बाधितांच्या संख्येत मंगळवारी (दि.२८) मोठी घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. ही दिलासा देणारी बाब असली तरी ३२ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

नाशिक शहरात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक केला असला तरी आताही संख्या घटत आली असून, त्यापैकी गेल्या तीन ते चार दिवसांपासून दोन हजारापर्यंतच नवीन बाधित आढळून येत आहेत. मात्र, मंगळवारी त्यात लक्षणीय घट झाली असून, एक हजार ७३ रुग्ण आढळले आहेत. यात नाशिक शहरातील ६३१, तर ग्रामीण भागात ४३७ आणि मालेगावमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्के इतका झाला होता तो आता घसरला असून, मंगळवारी तर तो आठ टक्के इतका झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. मंगळवारी ३२ रुग्णांंचा मृत्यू झाला असून, यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १६, ग्रामीण भागातील १५, तर मालेगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या चार हजार १६२ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात ६८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.