अमृत आहारात अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:04 AM2019-04-13T01:04:43+5:302019-04-13T01:06:20+5:30
इगतपुरी : तालुक्यातील वैतरणा परिसरातील नागोसली गावातील अंगणवाडीतून दिल्या जाणाऱ्या अमृत आहारामध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अमृत आहारात अळ्या आढळून आल्यामुळे ग्रामस्थ अशोक शिंदे यांनी अळ्यायुक्त आहार प्रकल्प अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा राग आल्याने सदर अंगणवाडी सेविकेने घोटी पोलिसांत त्यांच्या विरु द्ध तक्र ार दिली आहे.

तालुक्यातील नागोसली अंगणवाडीत नागोसली गाव, शिदवाडी येथील लाभार्थी या ठिकाणी लाभ घेतात; मात्र अंगणवाडी सेविका यांच्या नेहमी तक्रारी असल्यामुळे व त्या नेहमी आपल्या अधिकाराचा दम दाखवत असल्यामुळे ग्रामस्थ अंगणवाडीत येण्यास घाबरतात; मात्र पोषण आहारात अळ्या व किडेयुक्त निकृष्ट आहार दिल्यामुळे काही ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यामुळे अंगणवाडी सेविकेने मनात राग धरून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत नागोसलीचे ग्रामस्थ अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास ताठे, ढवळू होले, रवि ताठे, तानाजी शेलार, गिरिधर शिंदे यांच्यासह मंगला अशोक शिंदे, अंजना होले, उषा ताठे, शेवंता होले यांनी गटविकास अधिकारी किरण जाधव व बालविकास अधिकारी वंदना सोनवणे यांना निवेदन दिले असून, त्यांनी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकेकडून अमृत आहार शिजविण्याचा अधिकार काढून घ्यावा व त्यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा सर्व महिला व ग्रामस्थ आमरण उपोषण करू, असे निवेदनात म्हटले आहे.