राम कदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लासलगावी रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:27 PM2018-09-07T16:27:40+5:302018-09-07T16:28:13+5:30

लासलगाव : आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भातील केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी चौक ते कोटमगाव त्रिफुली वर निषेधाच्या घोषणा देत काही वेळ रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

 Lasalgaavi Roadarko protested against Ram Kadam's remarks | राम कदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लासलगावी रस्तारोको

राम कदम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लासलगावी रस्तारोको

Next
ठळक मुद्देया आंदोलना दरम्यान आमदार कदम यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तो हिसकावून घेतले. यावेळी राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.


लासलगाव : आमदार राम कदम यांनी महिलांसंदर्भातील केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी चौक ते कोटमगाव त्रिफुली वर निषेधाच्या घोषणा देत काही वेळ रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान वाहनाची मोठी गर्दी होत वाहनकोंडी झाली होती .

या आंदोलना दरम्यान आमदार कदम यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी तो हिसकावून घेतले. यावेळी राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पेट्रोल व डिझेल दरवाढीचा हि निषेधाचे निवेदन पोलीस निरीक्षक यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला .

या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे गुणवंत होळकर,पंकज आब्बड,सचिन होळकर,येवला-लासलगाव मतदार संघाचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. विकास चांदर, शिवसेनेचे जयदत्त होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे बबन शिंदे, मुन्ना शेख, मिराण पठाण, फौजान शेख, सुरेश कुमावत, वाजीद पठाण, शहजाद पठाण, संतोष राजोळे, चंद्रकांत ठोके आदी उपस्थित होते .  

Web Title:  Lasalgaavi Roadarko protested against Ram Kadam's remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.