मद्य दुकान सुरू करण्यास लासलगावी महिलांचा विरोध
By admin | Published: May 26, 2017 12:01 AM2017-05-26T00:01:25+5:302017-05-26T00:01:44+5:30
लासलगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेले मुख्य मार्गावरील दारू दुकान स्थलांतरित करण्यास परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढून विरोध केला
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेले मुख्य मार्गावरील दारू दुकान साईबाबा मंदिराजवळ स्थलांतरित करण्यास परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढून विरोध केला. स्थलांतरास परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
गावातील काही दुकानदार साईबाबा मंदिराजवळ दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करीत असून, यासाठी या दारू व्यावसायिकांनी लासलगाव-टाकळी (विंचूर) शिव रस्त्याचा सर्व्हे केला आहे.
सदरच्या परिसरात दाट लोकवस्ती असून, जवळ मंदिर आहे. यामुळे या उपरोक्त दारू दुकानास येथील महिलांचा विरोध आहे. या दारू दुकानास कोणत्याही प्रकारची परवानगी दिल्यास आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा या महिलांनी दिलेला आहे.
याबाबतचे निवेदन लासलगाव सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डी. के.जगताप, बाजार समिती माजी सभापती नानासाहेब पाटील, अलका हरले, रुपाली वाकचौरे, रेखा कदम, मीनाक्षी बागल, प्रांजल बागल, त्रिकला मानभाव, आशा वळवी, चंद्रकला आहेर, पूजा आहेर, सुरेखा जिरे, पुंजाबाई उशीर, अरुणा उशीर, चंद्रकला मुंडे, संध्या मुंडे, ज्योती कुमावत, आशा थोरात, कावेरी शिंदे आदींनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.