लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

By admin | Published: September 10, 2014 09:55 PM2014-09-10T21:55:37+5:302014-09-11T00:01:55+5:30

लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

Lasalgao Pomegranate litigation response | लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

लासलगावी डाळींब लिलावास प्रतिसाद

Next

 

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरु केलेल्या डाळींब लिलावास शेतकरी, आडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली.
लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर व कोपरगाव तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळींब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असल्याने त्यांची मालविक्रीची जवळपास सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे लासलगाव मुख्य बाजार आवारावर आठवड्याच्या दर सोमवार व बुधवार व शुक्रवार, शनिवार या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ अथवा आवक संपेपर्यंत डाळींबचा लिलाव सुरु केले आहेत.
डाळींब उत्पादकांनी आपला शेतीमाल योग्य प्रकारे निवड करून एकसारखा डाळींब २० किलोच्या जाळीमध्ये विक्रीस आणल्यास त्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे. किटका, पिचका, लहान (अपरिपक्व), खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेटस्मध्ये विक्रीस आणल्यास त्यांची खरेदी करणारे व्यापारी येथे उपलब्ध असल्याने डाळींबाच्या प्रतीप्रमाणे शेतकरी बांधवाना बाजारभाव मिळत आहे. डाळींबाची विक्री उघड लिलावाद्वारे होत असून, स्थानिक अडत्यांबरोबर परप्रांतीय व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकऱ्यांना उच्चतम बाजारभाव मिळत आहे. लिलावानंतर लगेच चोख वजनमाप व रोख चुकवती तसेच अन्य बाजार समित्यांच्या तुलनेत फक्त ५ टक्के आडत असल्याने शेतकऱ्यांची विक्री खर्चात बचत होत आहे.
दि. २९ आॅगस्टपासून आजअखेर २०५१० जाळ्यामधून ४,१०२ क्विंटल डाळींबाची कमीत कमी १५१+ जास्तीत जास्त १,६०० रुपये व सरासरी ९०० रुपये प्रती जाळी या दराने विक्री झाली. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला डाळींब शेतीमाल प्रामुख्याने दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसह देशातील इतर बाजारपेठेत पाठविला जात आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळींबांची लागवड झाली असून, यंदा ३.१५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. राज्यातील नाशिकसह अहमदनगर, पुणे व सोलापुर जिल्ह्यात डाळिंबाचे
मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Lasalgao Pomegranate litigation response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.