लासलगाव कोव्हीड सेंटर झाले फुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:02 PM2020-06-27T21:02:48+5:302020-06-27T21:03:41+5:30
लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे.
लासलगाव : येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात वीस रूग्ण संख्या पुर्ण झाल्याने पिंपळगाव बसवंत किंवा तालुक्यात अजुन एका नवीन कोरोना कोव्हीड उपचार केंद्राची आवश्यकता निर्माण झाली आहे.
व्यावसायीकांनी आता खबरदारीचा उपाय म्हणुन लॉकडाऊन काळातील सर्व दुकाने देखील बंद रहावीत या करीता विचारप्रवाह सुरू केला असुन लासलगाव येथील सुवर्णकार असोसिएशननंतर आता लासलगाव इलेक्तिट्रकल्स आणि इलेक्ट्रॉनिक असोसिएशनने देखील आता रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपळगाव बसवंत येथे सर्वाधिक २७ रूग्ण असुन आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज पाच नविन रूग्णांची त्यात भर पडली आहे. अशी माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली.
लासलगाव येथील कोरोना कोव्हीड उपचार केंद्रात अठराच बेडची मर्यादा आहे. त्यात विस रूग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहीती कोरोना कोव्हीड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी दिली.