लासलगावी बसच्या काचा फोडल्या, बंदला उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:51 AM2018-01-03T11:51:48+5:302018-01-03T11:53:42+5:30
लासलगाव. -कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र लासलगाव आगाराची ‘मनमाड मुक्कामी मनमाड- लासलगाव’ ही बस बुधवारी सकाळी अज्ञात युवकांनी काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर बस शिटवर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

तातडीने ही बस लासलगाव बस आगारात पोलिसांनी सुखरूप आणली. तसेच बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार बंद राहिले. बंदमुळे नुकसान होऊ नये म्हणून बसेस बंद ठेवण्यात आल्या व बस आगारात उभ्या आहेत.परंतु लासलगाव बस आगाराची मुक्कामी गेलेली मनमाड लासलगाव बस क्र मांक एमएच ४०- एन ८६१६ ही सकाळी लासलगाव साडेसहा वाजता लासलगावकडे येत असताना रेल्वे गेटवर काही युवकांनी काचा फोडल्या व या बसमधील वाहक चालक व आठ प्रवासी येत असताना काचा फोडून व पेट्रोल टाकुन बस जाळण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चालक एस.आर. आघाव, वाहक ई.के.सताळे यांच्यासह तीन प्रवासी व पाच विद्यार्थी होते. तातडीने प्रवासी घाबरून उतरले व बस पेट्रोल टाकुन बसण्याची तीन - चार आसने जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बस पेटवित असल्याचे समजताच अवघ्या काही मिनीटात लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे पोलिस हवालदार डी.के. ठोंबरे , प्रदीप आजगे , मधुकर उंबरे हे तातडीने पोहचले. त्यामुळे बसचे मोठे नुकसान टळली. येथील बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती आगारप्रमुख शेळके यांनी दिली.