लासलगाव परिसर कोरोनामुक्त; शासन नियमांचा पॅटर्न यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:01 PM2020-06-14T18:01:45+5:302020-06-14T18:02:13+5:30

लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्यात यश आले

Lasalgaon campus corona free; The pattern of governance rules is successful | लासलगाव परिसर कोरोनामुक्त; शासन नियमांचा पॅटर्न यशस्वी

लासलगाव परिसर कोरोनामुक्त; शासन नियमांचा पॅटर्न यशस्वी

Next
ठळक मुद्देचौघांची कोरोना चाचणी केली असता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह

नाशिक  : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ असलेले लासलगावसह परिसर कोरोनामुक्त झाले आहे कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांचा पॅटर्न राबविण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील लासलगावातील पहिला कोरोना बाधित रुग्ण डॉक्टर सापडला .या डॉक्टरच्या संपर्कात 7 जण कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त पंधरा दिवसानंतर मुंबई येथे कांदा विक्री करणारा कोरोना बाधित सापडल्याने कोरोनामुक्त लासलगावात खळबळ माजली होती शासनाच्या मार्गदर्शकानुसार कारवाई करत लासलगाव ग्रामपंचायतीला संसर्ग साखळी तोडण्यात यश आले आहे. आतापर्यंत 10 जणांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे.
लासलगाव येथील एक डॉक्टर कोरोना बाधित सापडला त्याच्या संपर्कातील 7 जणांना ही कोरोनाची बाधा झाली लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वाना क्वारंटाईन करत संसर्ग साखळी तोडण्यात यश आले मात्र पंधरा दिवसानंतर मुंबई येथे कांदा घेऊन जात विक्री करणाऱ्या विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आणि कोरोनामुक्त लासलगावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली मात्र लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाने हार न मानता पुन्हा शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कंबर कसत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करत सील केले सॅनटाईझर फवारणी केली कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील चौघांना होम क्वारंटाईन करत कोरोना चाचणी केली असता सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि कोरोना बाधित रुग्णाने कोरोनावर मात करत घरवापसी केल्याने आज लासलगाव कोरोनामुक्त झाल्याने लासलगाव ग्रामपंचायत प्रशासन ,पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास सोडला

 

Web Title: Lasalgaon campus corona free; The pattern of governance rules is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.