लासलगाव महाविद्यालय रस्ता सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 09:04 PM2021-02-14T21:04:53+5:302021-02-15T00:09:32+5:30
लासलगाव : येथील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
लासलगाव : येथील कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. संजय निकम, डॉ. विलास खैरनार, डॉ. भूषण हिरे, एनसीसी प्रमुख बापू शेळके, परिवहन समिती प्रमुख प्रा. हनुमान ठाकरे व लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे प्रमुख पाहुणे होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षीत वाहतुकीचे महत्व व नवीन परिवहन कायदे व तरतुदी समजावून सांगितल्या, महाविद्यालय ते पोलीस स्टेशन, बाजारपेठ, बसस्टँड, ग्रामपंचायत असे फेरीचे आयोजन करण्यात आले.
या रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा. मिलिंद साळुंके, प्रा. मोहन बागल, प्रा. देवेंद्र भांडे, प्रा.गायकर, प्रा. देवरे, प्रा. गणेश जाधव, प्रा. वळवी, प्रा. गांगुर्डे, प्रा. सोनवणे, प्रा. कदम, प्रा. कुलकर्णी, प्रा. तडवी, प्रा. पाटील, प्रा. जगताप आदींनी परिश्रम घेतले.