लासलगाव : बियाणे, महागडी औषधे देऊन आलेल्याला पिकाला भावच नाही थेटाळेत फ्लॉवर पीक शेतातच सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:08 AM2018-04-18T00:08:49+5:302018-04-18T00:08:49+5:30
लासलगाव : थेटाळे येथील महिला शेतकरी यमुनाबाई दौलत शिंदे यांनी २० गुठे फ्लॉवर पिकाची लागवड केली करून तयार केलेल्या फ्लॉवरला भाव नसल्याने व काढण्यासाठी येणारा खर्चही परवडणारा नसल्याने शेतात आहे तसेच फ्लॉवर सोडून दिले आहे.
लासलगाव : थेटाळे येथील महिला शेतकरी यमुनाबाई दौलत शिंदे यांनी २० गुठे फ्लॉवर पिकाची लागवड केली करून तयार केलेल्या फ्लॉवरला भाव नसल्याने व काढण्यासाठी येणारा खर्चही परवडणारा नसल्याने शेतात आहे तसेच फ्लॉवर सोडून दिले आहे. लासलगावपासुन जवळच असलेल्या थेटाळे येथे पाण्याची स्थितीही जेमतेमच आहे. पूर्वी तर पाणी टँकर पाचविला पूजलेला असायचा. त्यातच थेटाळे येथे शेती करणे म्हणजे पोराला तळहाताच्या फोडाला जपावे इतके महत्त्वाचे. मुरबाड जमिनीमुळे शेतीस पाणी जास्त लागते. शेतमालाला भाव नसल्याने काढणीस आलेल्या २० गुंठे क्षेत्रावरील फुलकोबी शेतातच सोडून द्यावा लागला. थेटाळे येथील महिला शेतकरी यमुनाबाई शिंदे यांनी २० गुंठे फ्लॉवर पिकाची लागवड केली. शेत नागरणी, कुळवणी, शेणखत टाकणे, वाफदळ पाडणे वा त्यानंतर प्रतिरोप ७० पैसे रोप घेऊन लागवड केली. अनेक प्रकारची कीटकनाशके, संजीवके आणि बुरशीनाशके फवारणी केली. शेतकऱ्याने जगावे की मरावे, अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी व्यक्त केली. पाण्याची कमतरता असतानाही पाणी देऊन पीक फुलवले मात्र भाव नसल्याने हाती काहीच लागले नाही. रासायनिक खते आणि विद्राव्य खतेही टाकली. पाण्याची परिस्थिती जेमतेम असताना उन्हाळ्यात भरपूर पाणी दिले तसेही या पिकाला भरपूर पाणी लागते. या पिकासाठी सारासार खर्च २० ते २२ हजार रु पये खर्च आला. अशा परिस्थितीत फ्लॉवर पीक तयार झाले; मात्र पीककाढणी आणि मार्केटपर्यंत वाहतूक खर्चही विक्रीतून मिळत नसल्यामुळे पीक शेतातच सोडून द्यावे लागले.