लासलगाव : दारणाचे पाणी नांदूरमधमेश्वर धरणात सोडण्याची मागणी
By admin | Published: February 26, 2016 11:04 PM2016-02-26T23:04:06+5:302016-02-26T23:22:24+5:30
१६ गावांवर पाणीटंचाईचे सावट
लासलगाव : नांदुरमधमेश्वर धरणात लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेला ४ ते ५ दिवस पुरेल एवढाच जेमतेम पाणीसाठा शिल्लक असून, योजनेवर अवलंबून असणाऱ्या
सोळा गावांमध्ये निर्माण होणारी पिण्याच्या पाणीटंचाई टाळण्यासाठी दारणा धरणातून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्याची मागणी सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व पदाधिकाऱ्यांनीे
कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या योजनेत लासलगाव व विंचूर ही मोठ्या लोकसंख्येची गावे येतात. त्यात बाजारपेठेमुळे पंचक्रोशीतून शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त बोजा पाणीपुरवठ्यावर कायम पडत
असतो.
जेणेकरून सोळा गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. निवेदनाच्या प्रति माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन
भुजबळ, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, निफाड तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहे.
निवेदनावर लासलगाव सरपंच संगीता शेजवळ, विंचूरचे सरपंच शकुंतला दरेकर, टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे, निमगाव वाकडा उपसरपंच ललित दरेकर, ब्राह्मणगाव विंचूरच्या सरपंच भारती गवळी, पिंपळगाव नजीकचे सरपंच शांताराम घोडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)