लासलगावी कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 03:10 PM2019-10-19T15:10:09+5:302019-10-19T15:11:29+5:30

लासलगाव : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी कांदा भावात घसरण झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल भावात १२० रुपयांची, तर सरासरी व किमान भावात १०० रुपयांची घसरण झाली.

 Lasalgaon falling onion prices | लासलगावी कांदा दरात घसरण

लासलगावी कांदा दरात घसरण

Next

लासलगाव : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी कांदा भावात घसरण झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल भावात १२० रुपयांची, तर सरासरी व किमान भावात १०० रुपयांची घसरण झाली. येथे शनिवारी १२२ वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. किमान ९५१ ते कमाल २८९२, तर सरासरी २४५० रुपये भावाने कांद्याची विक्र ी झाली. शनिवार, दि.१९ रोजी कांदा लिलाव फक्त सकाळच्या सत्रातच झाला. ९५१ ते २८९२ रूपये क्विंटल भाव मिळाला. आवक १२२ वाहनांतून झाली तर धान्य लिलाव बंद करण्यात आले होते. दि. २० रोजी रविवार, तर दि. २१ रोजी मतदानामुळे बाजार समितीमध्ये लिलाव होणार नसल्याचे सांगण्यात आले.
----------------------
इजिप्तचा कांदा मुंबईत दाखल
इजिप्तमधून आयात केलेला कांदा मुंबईत दाखल झाल्याच्या वार्तेने कांदा उत्पादकांना चिंतेत टाकले आहे. लालसर व थोडासा जांभळट रंगाचा हा मोठ्या आकाराचा कांदा आता देशातील भावावर काय परिणाम करतो, हे लवकरच समजेल. निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेला हा कांदा आता राजकीयदृष्ट्या कोणाला फायदेशीर ठरणार ते बघावे लागेल.

Web Title:  Lasalgaon falling onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक