मास्क न वापरल्याने लासलगावी दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 10:44 PM2020-06-21T22:44:14+5:302020-06-21T23:57:34+5:30
लासलगाव : कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर श्निवारी दिवसभरात विविध कलमान्वये दहा गुन्हे दाखल करून प्रत्येकी तीनशे रूपयाप्रमाणे तीन हजार रूपयांचा दंड वसूल केला.
लासलगाव : कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर श्निवारी दिवसभरात विविध कलमान्वये दहा गुन्हे दाखल करून प्रत्येकी तीनशे रूपयाप्रमाणे तीन हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे आता नागरिक मास्क लावून फिरतांना दिसत आहेत.
लासलगाव येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू असतात. परंतु काही व्यावसायिक पाच वाजेनंतरही दुकाने सुरू ठेवतात. अशांवर कारवाई केली जात आहे. तसेच ग्राहकांकडे मास्क नसतांना व्यवहार करणारे व्यावसायिक तसेच रस्त्यावर मास्कशिवाय फिरणारे लोक यांच्याविरूध्द कारवाई सुरू केली
आहे. दरम्यान, येथील सुवर्णकार सराफ असोसिएशनने दर रविवारी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.