लासलगावी शासकीय यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:29 PM2020-05-08T22:29:11+5:302020-05-09T00:05:42+5:30
लासलगाव : जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पिंपळगावनजीक येथे सापडला व तो बरा झाला असला तरी आता देवरगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केलेल्या एका डॉक्टरांचा व पिंपळगावनजीक येथील महिला अशा दोन कोरोना रुग्णांचे रिपोटर््स पॉझिटिव्ह आल्याने परिसरात शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

लासलगाव व पिंपळगावनजीक परिसरात बुधवारपासून पुढील आदेश येईपर्यंत सक्तीच्या लॉकडाउनमुळे आता जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. लासलगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या परिसरात लासलगाव ग्रामपंचायतीने प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरू केली आहे. लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर व ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी ही माहिती दिली. या परिसरात वैद्यकीय तपासणी व संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन योग्य त्या उपचारासाठी होम क्वॉरण्टाइन केले जात असल्याची माहिती निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांनी दिली.
लासलगाव व पिंपळगावनजीक परिसरात पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी दिला आहे. लासलगाव पोलीस कार्यालय परिसर सील केला असून, मेडिकल वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यात लासलगाव, पाचोरा, मरळगोई, टाकळी विंचूर, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विंचूर, कोलटेक पाटे, आंबेगाव, वेळापूर्, धरणगाव, विंचूर येथील पंचावन्न महिला पुरुष व्यक्ती आता चौदा दिवस क्वॉरण्टाइन करण्यात येणार आहेत.