लासलगावी वर्षभरात १,३१४ कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 11:01 PM2021-07-03T23:01:16+5:302021-07-04T00:21:29+5:30

नाशिक : कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला यंदा कोरोनाचा प्रचंड फटका बसलेला असतानादेखील शेतमालाने तारले असल्याचे दिसून येत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरात ८१ लाख ४३ हजार क्विंटल कांदा व इतर शेतमालाची आवक झाली असून, त्यातून १,३१४ कोटी ८० लाख ९८ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

Lasalgaon has an annual turnover of Rs 1,314 crore | लासलगावी वर्षभरात १,३१४ कोटींची उलाढाल

लासलगावी वर्षभरात १,३१४ कोटींची उलाढाल

Next
ठळक मुद्देकांद्याने दिली साथ : कोरोनाकाळातही बाजार समितीला आधार

नाशिक : कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या देशाला यंदा कोरोनाचा प्रचंड फटका बसलेला असतानादेखील शेतमालाने तारले असल्याचे दिसून येत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षभरात ८१ लाख ४३ हजार क्विंटल कांदा व इतर शेतमालाची आवक झाली असून, त्यातून १,३१४ कोटी ८० लाख ९८ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अनेक दिवस बाजार समितीत लिलावच बंद होते. तरीदेखील लासलगाव बाजार समितीने चांगली कामगिरी करत १,३१४ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. फक्त कांदा विक्रीतून बाजार समितीला ९३९ कोटी रुपयांचे थेट उत्पन्न मिळाल्याची माहिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासार्ह कामकाजामुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंती असते. कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदा, धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंबासह आदी शेतमालाची उलाढाल वाढली आहे. गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत, तसेच शनिवारीदेखील कांदा लिलाव सुरू राहणार असल्याने यंदा बाजार समितीत उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याबरोबर धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब आदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीचे आवारदेखील कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येथे पाहायला मिळत आहे. चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील ७४ देशांत निर्यात केला जातो.

Web Title: Lasalgaon has an annual turnover of Rs 1,314 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.