लासलगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:53 PM2020-12-08T13:53:53+5:302020-12-08T13:54:35+5:30

बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत डचके यांना निवेदन दिले.

Lasalgaon has a turnover of crores | लासलगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

लासलगावी कोट्यवधींची उलाढाल ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देआज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही

नाशिक : कृषी कायद्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज बंद आवाहनास येथील व्यवसायीक यांनी 100 टक्के व्यवसाय बंद ठेऊन पाठींबा व्यक्त केला. तसेच लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच रिक्षा, बससेवा बंद असल्याने  रस्त्यावर शुकशुकाट आहे. येथील सर्व व्यावसायिकांनी स्वयस्फुर्तीने बंद ला शंभर टक्के प्रतिसाद दिला. 

बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कोट्यवधी रूपयांची उलाढाल होऊ शकली नाही. कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव बाजार समितीत निवेदन देऊन उद्यापासून पुर्ववत लिलाव सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन बाजार समितीत सुनील डचके यांना निवेदन दिले.
ग्रामीण भागातून शहरात येण्याचे महत्वाचे माध्यम एसटी आहे आणि हीच वाहतूक बंद झाल्याने सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. आज सकाळपासून एकही बस लासलगाव स्थानकातून सुटलेली नाही.
येथील नागरिकांनी कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी दि.8 डिसेंबर रोजी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे या महाविकास आघाडीचे वतीने करण्यात आलेल्या आवाहनास येथील नागरिकांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन पाठींबा दिला.

येथे बंदच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद ठेवून शंभर टक्के पाठींबा दिला.त्यानंतर गुणवंत होळकर यांचे हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मिरान पठाण,डॉ विकास चांदर,  बबन शिंदे, संतोष राजोळे, रामनाथ शेजवळ, अनिल भागवत, विजय भंडारी, हर्षद शेख, दिनेश जाधव  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर एस सोनवणे व पोलिस कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असुन केवळ उद्योगपती धार्जीणे धोरण राबवुन केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला शेती व्यवसायाला या मोठ्या उद्योगपतीच्या तालावर वाचविण्यासाठी सरकारने हे कायदे आणले आहे. देशभरातील शेतकरी संतप्त झाले आहे अशी माहिती जयदत्त होळकर यांनी दिली.

Web Title: Lasalgaon has a turnover of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.