सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:17 AM2019-08-12T01:17:16+5:302019-08-12T01:17:35+5:30
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.
शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दोन पिकअपमध्ये खाद्यपदार्थ व भाजीपाला सांगली जिल्ह्यातील मालगाव येथे पाठवण्यात आला. रविवारी मालगाव येथील जि प प्राथमीक शाळा येथे असलेल्या पूरग्रस्तांना या मदतीचे वाटप करऱ्यात आले. या ठिकाणी अद्याप कोणतीही शासकीय मदत न पोहोचल्याने नागरिकांना ही मदत लाखमोलाची वाटली. या ग्रुपचे सूरज नाईक, शैलेश भोर व बापू धरम यांच्या संकल्पनेतून निधी जमा करून मदत पाठविण्यात आली.यामध्ये ७०० किलो तांदूळ,७०० किलो गव्हाचे पीठ,१२०० बिस्कीट पुडे, ५० कॅरेट केळी, पन्नास पोती भत्ता,५००० बिसलेरी पाणी बाटल्या, तीन पोती फ्लॉवर, तीन पोती कोबी, २०० किलो मिरच्या, तीनशे किलो बटाटे असे साहित्य होते.
या मोहिमेत सूरज नाईक, शैलेश भोर, बापू धरम ,राहुल शेजवळ मच्छिंद्र काळे, पप्पू मोमीन, विनोद ठोंबरे ,संदीप आहेर, संजय व्हलगडे, दीपक केदारे, संदीप उगलमुगले, विठ्ठल न्याहारकर, सोपान विसे अमोल काळे, बापू डांगे ,सुदर्शन तीपायले ,अक्षय जगताप, दशरथ राजोळे ,रेवणनाथ गरड ,विलास नेवगे ,मयूर शिरसाट, हर्षद बंद्रे, आदी उपस्थित होते.